लोणार (हॅलो बुलढाणा /राहुल सरदार) ईद मिलादुन्नबीच्या प्रसंगी २२ सप्टेंबर रोजी लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल येथे अंतिम परीक्षा घेण्यात आली. १३ सप्टेंबर रोजी डॉ जाकिर हुसैन उर्दू हायस्कूल व जूनियर कॉलेज लोणार आणी जमीयते उलेमा ए हिंद लोणार व शहरातील मान्यवर यांच्या संयुक्त विद्यमाने सिरतुन्नबी क्विज कॉम्पिटिशनचे जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या १२,४३५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. व अंतिम राऊंडमध्ये आज २२ सप्टेंबर रोजी ६३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या निमित्ताने बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सिरतुन्नबी क्विज कॉम्पिटिशनचे
जमीयते उलेमा ए हिंदचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी अध्यक्ष म्हणून लाभले, तर प्रमुख उपस्थिती मध्ये विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन शाह कासमी, दिनी तालीमी बोर्डचे राज्य अध्यक्ष,मौलाना इब्राहिम,नागपूर हायकोर्टचे एडवोकेट आबिद हुसेन,जमियतचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष मोलाना शरीफ सह जिल्ह्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना सऊदी अरब येथील मक्का-मदीना शहराचे दर्शन अर्थात उमराह टूर बक्षीस म्हणून देण्यात आले. प्रथम दोन बक्षीसांपैकी बुलढाणा जिल्ह्याचे बक्षीस जाकीर हुसेन कॉलेज तर्फे आयशा सिद्दीका शेख रियाज अंजुमन हायस्कूल खामगाव यांना तर लोणार शहराचा शेख सर, विदर्भ अकॅडमी संचालक लोणार यांच्या तर्फे मोहम्मद जैद मोहम्मद रिजवान जड्डा, इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल लोणार यांना देण्यात आला. तर द्वितीय क्रमांकास आलेले आमेना फिरदोस सय्यद मुनिरोद्दीन,उर्दू हायस्कूल जळगाव जामोद यांना, शेख गय्यूर भाई, कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूल तर्फे फ्रिज, तृतीय क्रमांकावर असलेले आयशा सिद्दीका आयाज खान, मौलाना आझाद नगर परिषद हायस्कूल मलकापूर, यांना लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल तर्फे वॉशिंग मशीन,चतुर्थ विजेत्या अम्मारा फिरदोस मोहम्मद यासीन, नॅशनल उर्दू हायस्कूल रोहिणखेड यांना हाजी रिजवान जड्डा यांच्याकडून पाणी फिल्टर तर पाचवा क्रमांक घेतलेले शेख अनस शेख अनिस, इनायतीया हायस्कूल नांदुरा यांना जुबेर भाई नॅचरल एकवा मेहकर तर्फे आर ओ वॉटर फिल्टर देण्यात आले. तर सहाव्या क्रमांकावर असलेल्या सादिया फिरदोस जमील खान, मौलाना आझाद उर्दू स्कूल नांदुरा, यांना सोनू सायकल स्टोअर्स लोणार तर्फे एक आकर्षक सायकल सप्रेम भेट म्हणून देण्यात आली. सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे शेख अयान शेख आनिस ईनायतिया उर्दू हायस्कूल नांदुरा, यांना अब्दुल्लाह भाई चिखली यांच्यातर्फे वॉटर गिझर भेटवस्तू म्हणून देण्यात आली.याशिवायही उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या ८२ विद्यार्थ्यांना ८२ हजारचे रोख बक्षिसे देण्यात आले. तसेच दुसऱ्या राउंडमध्ये शामील होणाऱ्या सर्व ६३७ विद्यार्थ्यांना हाजी महेमूद सेठ यांच्या तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.कार्यक्रमाची संकल्पना शेख फैसल यांनी आखली तर प्रस्ताविक प्राध्यापक शारीक शेख, सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर फिरोज खान आणि लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचे उपप्रचार्य नबिल शेख यांनी तर आभार प्रदर्शन जाकीर हुसेन ज्युनियरचे प्राचार्य रफिक सर यांनी केले. यावेळी मंचावर मनसब खान सर, हाजी नूरमोहम्मद, अध्यक्ष मसूद सेठ, शेख महेमूद सेठ, हाजी रिजवान जड्डा, गफ्फार मेंबर, रिजवान खान करामत खान, शहराध्यक्ष शेख अयाज, इजहार खान, वसीफ अहमद खान, वसीम खान सर, अल्ताफ हुसेन, गफुर भाई,साबिर अली सह अनेक मान्यवर उपस्थित होते.