बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भोळ्या- भाबड्या अंधभक्तांना जर कुणी गंडवीत असेल तर त्या बाबाला तेथेच दाबण्याचे आवाहन ‘हॅलो बुलढाणा’ ने तत्पूर्वी केले आहे.दरम्यान रायपूर पोलिसांनी जादूटोणा करणाऱ्या एका बोगस बाबावर गुन्हा दाखल करून त्याला जेलात डांबले व नंतर त्याला सूचनापत्रावर सोडण्यात आले आहे.
सैलानी श्रद्धास्थान सर्वश्रुत आहे.येथे नेहमीच दुःखी कष्टी यांच्या समस्यांच्या समाधानासाठी वर्दळ असते. आरोपी बोगस बाबा समशेर खा पठाण 52 राहणार पिंपळगाव सराई तालुका जिल्हा बुलढाणा याने सैलानी येथे 21 सप्टेंबरला एका भक्ताच्या डोक्यावर उपचारार्थ लिंबू कापून मंत्र तंत्र म्हणून व्याधी कमी करून देतो असे म्हणत भाविकांकडून पैशांचा मोबदला मागितला.हा बाबा माझ्याकडे अदृश्य शक्ती आहे हे म्हणायला विसरला नाही.या बाबांनी अनेक भोळ्या भाविकांना फसविल्याचे पोलीस सांगत आहेत.दरम्यान एका गुप्त माहितीवरून पोलीस जेव्हा या बोगस बाबाकडे पोहचले तेव्हा घटनास्थळी पूजेमधील काळे बाहुले,नाल,बीबे गोटे,धागा असे साहित्य आढळून आले.त्यामुळे पोलिसांनी आरोपी बाबा विरुद्ध कलम 3(1),(2) (3) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.परंतु बाबांनी सूचना पत्र दिल्याने त्यांना सोडण्यात आले आहे.अधिक तपास एएसआय ओम प्रकाश सावळे करीत आहेत.