बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आता सर्वत्र दुर्गोत्सवाचे वेध लागले आहेत. नवरात्रोत्सव म्हणजे गरबा, खेळण्याचा जणू उत्सवच ! देवीची आराधना गरबा, रूपातही करीत असतात.नवरात्रात गरबा नाही खेळला तर नवरात्रीची धम्माल पूर्ण होत नाही.म्हणूनच ‘हॅलो बुलढाणा’ न्यूज वेब पोर्टल व कायस्थ कॅटर्स ॲण्ड इव्हेंट मॅनेजमेंट व टॅटू टेम्पल तर्फे येथील राजे लॉन्स विष्णूवाडी येथे कालपासून सुरू झालेल्या मोफत विशेष गरबा प्रशिक्षणाला उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर दरम्यान सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत महिलां व मुलींसाठी मोफत गरबा प्रशिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने 3 ते 11 ऑक्टोंबर पर्यंत होणाऱ्या गरबा महोत्सवात लाखोंची बक्षीस जिंकण्याची संधी देखील उपलब्ध होत आहे.
नवरात्रमध्ये नऊ दिवस गरबा खेळण्याला विशेष महत्त्व असते. नऊ दिवसात देवीची पूजा केली जाते. तर प्रत्येक घरामध्ये आनंदाच उत्साहाचं वातावरण असते. तसेच नवरात्रमध्ये गरबा खेळला जातो.मात्र, अनेकांना गरबा आणि दांडिया खेळण्याची इच्छा असताना देखील त्यांना खेळता येत नाही.गरबा नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसेल तर हे पारंपारिक नृत्य काही फुलत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन ‘हॅलो बुलढाणा’ व बुलढाणा कायस्थ कॅटर्स तर्फे गरबा खेळणाऱ्या भाविकांसाठी काल पासून मोफत प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे.प्रशिक्षणाच्या पहील्याच दिवशी मुली व महिलांनी गरबा नृत्यावर धमाल उडविली आहे. इच्छूक भाविक महिला मुलींनी या गरबा महोत्सवात सहभागी होऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.