बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे शहरातील जिजामाता मैदानावर अस्वच्छता निर्माण झाल्याने स्वच्छतेसाठी माऊली ग्रुप व गुड मॉर्निंग ग्रुपच्या हाती खराटा घेऊन मैदान चकाचक करून आपले सामाजिक दायित्व निभावले.
शहरात नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येऊन गेलेत निमित्त होते ते लाडकी बहीण योजना व शहरातील विविध महात्म्याचे स्मारकांची उद्घाटने याचे.. दरम्यान जिल्हा भरातील कार्यकर्ते व महिला वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना त्यांच्या वाहनाची पार्किंग करण्यासाठी जिजामाता कॉलेजचे मैदान उपलब्ध करून दिले या ठिकाणी सर्वच वाहने पार केली होती. या ठिकाणी अन्नाची पाकिटे देण्यात आली. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र मैदानावर संपूर्ण ठिकाणी अन्नाची पाकिटे उघड्यावर पडली होती ही पडलेली अन्नाची पाकिटे संपूर्ण परिसरात दुर्गंधी निर्माण करत होती. बुलढाणा शहरातील माऊली ग्रुप व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सुधाकर मानवतकर, मोहन दलाल ,सुधीर भालेराव, राजेंद्र वानेरे ,शंकर लोखंडे, अभिजित सवडकर ,प्रकाश सावळे,कैलास मोरे ,योगेश बांगडभट्टी, श्रीकांत जोशी ,संजय कस्तुरे, बर्डे पाटील, सुरडकर, भोसले, मोरे आदींनी जिजामाता कॉलेजच्या मैदानावर नुकतेच पार पडलेल्या मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या कार्यक्रमानिमित्त शहरात ठीक ठिकाणी वाहने जमा करून वाहन चालक व लाडकी बहिणीची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना ठीक ठिकाणी अन्नदान देण्यात आले परंतु जास्तीचे अन्न त्यांनी आहे तिथेच टाकून निघून गेले त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी सुटली होती.
दोन दिवस उघड पडलेले अन्न बऱ्यापैकी खराब झाले होते त्यामुळे पहाटेच्या वेळी मैदानावर येणारे वय वृद्ध फिरणारे तरुण मुलं यांना त्याचा त्रास होत होता परंतु कोणीही या कामासाठी पुढे आले नाही आज कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग ग्रुप बुलढाणाचे सदस्य यांनी संपूर्ण परिसरात पडलेले अण्णांची उष्ठावळे उचलून एक सामाजिक दायित्व पूर्ण केले. यावेळी काही महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला.