spot_img
spot_img

मुख्यमंत्र्यांची वयोवृद्ध लाडकी बहीण उद्या उपोषणाला बसणार ! -2 वेळा अटॅक, एकदा बायपास तरीही उपोषणाचा निर्धार.. -स्वाभिमानाने जगले आणि स्वाभिमानानेच मरणार! -पोलीस प्रशासन गावगुंडांना पाठीशी घालत असल्याचा आरोप !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्या मुख्यमंत्र्यांचे बुलढाण्यात आगमन होत असून,त्यांच्याच एका लाडक्या वयोवृद्ध पिडीत बहिणीने न्याय मिळत नसल्याने दोन वेळा बायपास सर्जरी झाल्यानंतरही उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

स्थानिक मिलिंद नगर येथील रहिवाशी निराधारांना आधार देणारी 68 वर्षीय पंचफुला गवई आज स्वतःच बेघर झाली आहे. चरितार्थ चालविण्यासाठी धुनी भांडी करून आजही कष्टाने पोट भरणाऱ्या पंचफुला गवई यांची कष्टाने कमवलेली पाई पाई चोरीला गेली.
पंचफुला गवई यांनीच आधार दिलेल्या परंतु आज रोजी कुख्यात गावगुंड असलेल्या गणेश गवई याने पंचफुला आईचे दागिने आणि घरातील रोख, रक्कम भांडेकुंडे चोरले आणि विकले. घरात अनधिकृत शस्त्र साठा जमा केला. एवढी गंभीर तक्रार असताना साधी दखल पोलीस प्रशासनाने घेतले नाही.
काबाडकष्ट करून एक एक रुपया जमवणाऱ्या पंचफुला आईने आयुष्यभर कमवलेली कमाई गावगुंड गणेश गवईने चोरून घेतली. उलट पक्षी 68 वर्षीय पंचफुला आईला मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. त्यामुळे पंचफुला गवळी यांना दोन वेळा अटॅक आला बायपास झाले. न्याय मिळावा यासाठी त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या. परंतु चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार पंचफुला गवई यांच्या वाट्याला आला. आरोपींने आत्महत्या करण्याची धमकी देत. दैनंदिन पैशाची मागणी सुरू केली. पोलिसांशी संगणमत करून आईला पागल असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
परंतु पंचफुला आई मरतांना स्वाभिमानाने मरण्याचा संकल्प करत गावगुंड आरोपीला शासन झाले पाहिजे. आज ही वेळ माझ्यावर आहे‌ ही वेळ दुसऱ्यावर यायला नको.
यासाठी 19 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा निर्धार केला. जिल्हा प्रशासन, आमदार,सामाजिक कार्यकर्ते यांना निवेदन दिले. तरीही साधी दखल अद्याप पर्यंत घेण्यात आली नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!