बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे प्रकरण काही थांबतांना दिसत नाही. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे.’संजय गायकवाड हा माणूस राजकारणात व समाजात राहण्याच्या लायकीचा नसल्याचे’ त्यांनी म्हटले आहे. श्री लोंढे यांचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे म्हणाले की, संजय गायकवाड हा माणूस राजकारणात व समाजात राहण्याच्या लायकीचा नाही.देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला विचारायचा आहे की महाराष्ट्रात कायद्याचे राज्य लोकशाही आहे की तालिबानशाही आहे?आरक्षणाचे खरंच एवढं वावडे असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने संविधान संपवित होते त्यामुळे तुम्ही जनतेचा विश्वास गमावला आहे.हा विश्वास परत घ्यायचा असेल तर 50 टक्के मर्यादा काढा,विशेष अधिवेशन बोलवा व यावरची पहिली भूमिका मांडा असेही
काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे व्हायरल केलेल्या व्हिडिओत म्हणाले आहे.