बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांनी देशाचे विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांच्यावर जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देण्याचे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी गायकवाड यांना आंबेडकर विरोधी म्हणत ‘जीभ छाटायची सोडा,गांधींच्या केसाला सुद्धा टच करून दाखविल्यास एक कोटी रुपये देतो ‘ असे ओपन चॅलेंज केले आहे.
वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या गोळ्या संपल्यात. केवळ प्रसिद्धीसाठी काही पण बरळायचे आणि सस्त्यातील प्रसिद्धी करून घ्यायची.जीभ छाटायची सोडा लोक काय येडे आहेत की काय?मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय काय आमदार पाळून ठेवले हे याचे उत्तम उदाहरण आहे.आज बरे आमदार गायकवाड यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवले. जेव्हा बाबासाहेबांच्या लेकरांना खामगाव मध्ये जातिवाद्यांनी मारले.तेव्हा तिथे दहा हजारांची फौज घेऊन येतो.ॲट्रॉसिटीला क्रॉस केस करा असे म्हटले. दलितांवरील हल्ले होताना क्रॉस केसची भाषा करता आणि त्याची आतापर्यंत सुद्धा माफी मागू शकले नाहीत. तुम्ही काय दिवे लावले आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे जरा नीट रहा. जीभ छाटण्याची भाषा करता.जीभ छाटायची सोडा राहुल गांधी यांच्या केसाला टच केला तरी मी एक कोटी रुपये देईल.त्यांच्या घराच्या गेट जवळ जरी फिरकला तर छातीत किती गोळ्या घुसतील याची कल्पना आहे का? काय संरक्षण आहे देशाची काय यंत्रणा आहे?हे कळतंय का? आणि जीभ छाटायची भाषा करता..तुम्ही आंबेडकर विरोधी आहात हे बुलढाण्याला माहित आहे.जीभ छाटायचे सोडा फक्त गांधींच्या केसाला हात लावून या मी एक कोटी रुपये देतो अशा परखड शब्दात ऑल इंडिया पॅंथर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आमदार संजय गायकवाड यांचा सडकून समाचार घेतला.