बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या व अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलताताई सोनोने त्यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली. ना.एकनाथ शिंदे यांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवून राजमाता माँ जिजाऊंचा सन्मान करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.यावेळी त्यांनी उमेदवारीची गळ सुद्धा घातली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागत आहेत. आपल्या केलेल्या कार्याचा लेखाजोखा त्यांच्याकडे मांडून पक्षाची तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला जातोय.शिवसेना नेत्या व अस्तित्व संघटनेचे अध्यक्ष प्रेमलताताई सोनोने यांनी देखील यंदाची विधानसभा निवडणूक लढण्याची पूर्ण शक्तीनिशी तयारी केली आहे.मोताळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रेद्वारे त्या गावोगावी गाठीभेटी घेत आहेत.त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.विविध अभिनव आंदोलनातून त्यांनी शेतकरी बेरोजगार व महिलांचे प्रश्न सोडविले आहेत.आगामी मोताळा बुलढाणा विधानसभा मतदार संघात सोनोने ह्या लढण्यास इच्छुक असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतली. बुलढाणा विधानसभा मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवून राजमाता माँ जिजाऊंचा सन्मान करावा अशी मागणी करून उमेदवारीसाठी गळ घातली आहे.