spot_img
spot_img

💥ब्रेकिंग! खडकपूर्णा प्रकल्पातील 3 बोटी नष्ट ! -रेतीमाफी यांचे धाबे दणाणले ! -पोलीस व महसूल प्रशासन यांची संयुक्त कारवाई!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रेतीची तस्करी खुलेआम सुरू असून धरणातील रेती बोटी द्वारे उपसण्यात येत आहे.दरम्यान मौजे सिनगाव जहांगीर येथील बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पातील दोन फायबर बोटी व एक इंजन बोट जिलेटिनच्या साह्याने नष्ट करण्यात आल्याची कारवाई काही वेळेपूर्वी करण्यात आली.

ही कारवाई आज 16 सप्टेंबर रोजी
उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार देऊळगाव राजा, एपीआय अंढेरा पोलीस स्टेशन, व महसूलच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली आहे.

मौजे सिनगाव जहांगीर येथील धरणातील रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे.रेती तस्कर वाढदिवसा किंवा रात्रीचा फायदा घेऊन रेतीचा उपसा करतात.रेतीचा उपसा करण्यासाठी बोटीचा वापर करण्यात येतो.दरम्यान आज मौजे सिनगाव जहांगीर येथील धरणातील दोन फायबर बोटी व एक इंजन बोट जिलेटिन च्या साह्याने नष्ट करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली.त्यामुळे रेतीमाफीयांचे धाबे दणाणले आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ,अंढेरा ए. पी.आय विकास पाटील यांनीही कारवाई केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!