spot_img
spot_img

💥 Exclusive अखेर आमदार संजय गायकवाड यांच्यावर अ दखलपात्र गुन्हा दाखल!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांच्या राहुल गांधी वरील वक्तव्यावरून काँग्रेसने आंदोलनात्मक पवित्रा घेत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी रेटून धरली होती .दरम्यान काही वेळापूर्वीच गायकवाड यांच्यावर अदाखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे.परंतु काँग्रेसने आंदोलन सुरू ठेवत दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटून धरली आहे.

‘आमदार संजय गायकवाड यांचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय !’ अशा घोषणा पोलीस
निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या दालनात
देण्यात येत आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वीच आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखत झालाय मात्र एवढ्यावर काँग्रेस नेत्यांचं समाधान झालेले नाही.जो पर्यंत दखलपात्र गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातच उपोषण करण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांकडून देण्यात येत आहे. आमदार गायकवाड यांचे विरोधात भारतीय न्याय संहितेच्या ३५१ (२), ३५१कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु काँग्रेसचे आंदोलन सुरूच आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!