बुलडाणा (हॅलो बुलढाणा) इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) शहरात जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीने बुलढाणेकरांचे लक्ष वेधले.
शहरातील मुस्लीमबहुल भागात समाजबांधवांकडून आपआपल्या परिसरासह घरे, दुकानांवर सजावट करण्यात आली होती. यामुळे मोहल्ल्यांचे रूप पालटल्याचे चित्र होते. इंदिरा नगर येथून जुलूस संगम चौक, जयस्ताभ चौक,जामा मस्जिदपासून परत सराफ लाईन येथून ईदगहा या मार्गे जुलूस काढत कशिदा गायन करत ईद ए मिलाद सण उत्साहात साजरा करण्यात आला.
इंदिरा नगर मध्ये तसेस रस्ते, विविध चाैक, मशिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी हिरवे झेंडे विक्रीसाठी स्टाॅल्स लावले आहेत. सोमवारी सकाळी 9 वाजता ईद-ए-मिलादुन्नबी विविध सामाजिक संघटना वतीने सकाळी ९ वाजता इंदिरा नगर येथून भव्य जुलूस काढण्यात आले आदी संगम चॊक जयस्तंम चोक इकबाल चॊक ठिकाणी सरबत वाटप, अन्नदान वाटप करण्यात आले.
▪️तरुण एक महिना आधीपासून करतात तयारी
शहरातील विविध भागांतील मुस्लिम तरुण आपापल्या भागातील मित्रांसोबत मिळून वर्गणी जमा करून मुजाफिर (गोड भात) तयार करून वाटतात. विद्युत रोषणाईसाठी पैसे जमवतात. रोषणाईत ईदच्या शुभेच्छा तसेच मक्का व मदिनाचे चित्र झळकत आहे.शहरात विद्युत रोषणाई
इंदिरा नगर शेर अली चॊक इकबाल चॊक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहर उजळून आहे. रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी शहरासह जुनागाव चॊक आदी भागांत मुजाफिर (गोड भात) तयार करून तो वाटप करण्यात आले तसेस मोहम्मद सज्जाद यांच्या कडून पुरी खीर वाटप केले यावेळी कार्यक्रमच्या समारोह जुना गाव ईदगा येथे करण्यात आले
जामा मस्जिद चे इमाम मंजूर अकबरी, हाफिज वाजीद, हाफिज सलामन, मदिना मस्जिद इमाम, तसेस इंदिरा नगर मधून, मोहम्मद अरिफ, युसूफ खान, समीर खान, पत्रकार रहेमत अली, शाकीर राजा, जुनागांव, साहेजाद नवाब, सद्दाम नवाब, रईस काझी,समीर खान, मोहम्मद आरीफ, युसूफ खान, मोलाना वाजीद साहब , शमशेर पठान , शेख वाजीद ,शेख अलीम , शाहेबाज शाह , असलम शाह,अजर अहेमद,शेख समीर , तनवीर शेख,अक्रम शेख, मजहर खान , रेहान मस्तान , शेख राजा, सलमान खान,शेख विकार, शेख मजास, समीर शाह,सोनु हफीज,शेख ईमाम, इम्रान शाह, अफरोज बागवान, अन्सार शाह, फारूक शाह,मोहम्मद वासिम,नासिर शाह,अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते .