बुलढाणा (हॅलो बुलढाणा) देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटण्याच्या आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताहेत.आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा धिक्कार करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सुद्धा तिखट प्रतिक्रिया देत आमदार गायकवाड यांना युएपी अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.राहुल बोंद्रे म्हणाले की,आमदार संजय गायकवाड स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हापापलेले असून ते काहीही करायला तयार आहेत.खरंतर राहुल गांधींच्या जिभेपर्यंत काय त्यांच्या पायाच्या नखापर्यंत ही त्यांचे हात पोहोचू शकत नाहीत.राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.राहुल गांधी पंतप्रधाना
नंतर देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत.राहुल गांधी केवळ खासदार नाहीत किंवा सामान्य नाहीत.देशाच्या विरोधीपक्ष नेत्यांना जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्यालातात्काळ अटक करून यूएपी अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी राहुल बोंद्रे यांनी ‘हॅलो बुलढाणा’शी बोलताना केली आहे.