बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा आक्रमक शब्द फेककेली असून काँग्रेस नेते राहुल गांधीवर घणाघाती अशी विखारी टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आमच्या देशातील आरक्षण धोक्यापासून आरक्षण संपविण्याचा घाट केल्या जात असल्याचे विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड चांगलेच भडकले असून ‘राहुल गांधी यांची जीभ जो कोणी छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देण्याची त्यांनी पत्र परिषदेत गायकवाड यांनी घोषणा केली.
आज आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथील त्यांच्या मातोश्री कार्यालयात पत्रकार परिषद बोलवली होती.मीडियाने प्रश्न छेडला असता पत्रकार परिषदेत आमदार संजय गायकवाड यांनी टोकाचे विधान केले.
आमदार गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर चर्चेत असतात. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप व चिखल फेक करण्यात येत आहे.राजकीय नेते एकमेकांची धुणे धुताना दिसून येत आहेत.सोयीच्या राजकारणासाठी विरोधकांवर टीका टिपणी करणे आता नवीन राहिलेले नाही.शिंदे गट शिवसेना काँग्रेसवर हल्लाबोल करताना सर्वत्र दिसून येत आहे.दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी देखील बुलढाण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली.
गायकवाड म्हणाले की राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आरक्षण धोक्यात असल्याचा प्रचार केला.आताही अमेरिकेत राहुल गांधी यांनी आरक्षण संपवित असल्याचा आरोप केल्याने आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षीस घोषित केले आहे.
पहा काय म्हणाले आमदार संजय गायकवाड