8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणेचा विषय: कृष्णा सपकाळ यांचे प्रतिपादन! ठाणेदार विकास पाटील म्हणाले, जीवनात संघर्षाची तयारी ठेवा… देऊळगाव घुबे येथे विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने शिवव्याख्यान संपन्न….

देऊळगाव घुबे (हॅलो बुलडाणा) अख्या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचा हेवा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इजराइल सारखे छोटेसे राष्ट्र चुहुबाजूंनी शत्रुराष्ट्र असताना देखील ताठमानेने उभे आहे. व्हिएतनाम सारखा छोटा देश अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला २७ वर्षे झुंजवत ठेवतो आणि अखेर अमेरिकेला देखील गुडघे टेकायला भाग पाडतो कारण व्हिएतनामच्या स्वातंत्र्याची देवता छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे तिथले राष्ट्राध्यक्ष सांगतात. आयुष्यात मोठे ध्येय ठरवून ते कसे प्राप्त करायचे याचा वस्तुपाठ शिवचरित्रातून शिकायला मिळतो, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणेचा विषय आहेत असे प्रतिपादन पत्रकार तथा शिवव्याख्याते कृष्णा सपकाळ यांनी केले. देऊळगाव घुबे (ता.चिखली) येथे विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी आयोजित शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील अनेक घटनांना स्पर्श केला. शिवरायांना स्वतःला राजा व्हायचे होते म्हणून त्यांनी स्वराज स्थापन केले नाही तर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वतःच्या सामर्थ्याचे विस्मरण झालेल्या आणि गुलामीच्या मानसिकतेत गेलेल्या समाजातूनच त्यांनी प्रचंड ताकदीचे वीर योद्धे उभे केले. समाजाची,राष्ट्राची उभारणी करीत असताना एका नेत्याची भूमिका कशी असली पाहिजे हे शिवचरित्रातून शिकायला मिळते असे ते म्हणाले.

जीवनात संघर्षाची तयारी ठेवा.. 

यावेळी बोलतांना ठाणेदार विकास पाटील यांनी तरुणांनी आयुष्यात संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन केले. जीवनात एकदा अपयश आले म्हणजे खचून जायचे नसते, अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे सांगत असताना एका शेतकऱ्याचा मुलगा ते ठाणेदार असा प्रवास विकास पाटील यांनी सांगितला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!