बुलडाणा (हॅलो बुलढाणा) अल मदिना एज्युकेशन सोसायटी द्वारा ईद ए मिलाद आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल १५२ जणांनी रक्तदान करून ‘रक्तदान सर्वश्रेष्ठ दान’असा संदेश अधोरेखित केला आहे.
बुलडाणा जामा मस्जिद इक्बाल चौक येथे ईद ए मिलाद निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराला प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अल्प वि) उपध्यक्ष मोईन काझी यांनीरक्तदान करून युवकांचा उत्सव वाढविला.
दरम्यान महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपध्यक्ष ॲड संजय राठोड,बुलडाणा ठाणेदार नरेंद्र ठाकरे,काँग्रेस प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके,महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अल्प वि)उपध्यक्ष मोईन काझी,माजी नगराध्यक्ष पती, नगरसेवक मोहम्मद सज्जाद, सईद सेठ कोतली माजी उपनगरध्यक्ष जुनेद सेठ डोंगरे, मौलाना मंजूरअक्बरी,हाफिझ रहमत, नगर सेवक सय्यद असिफ युनूस कुरेशी,शेख अफसर मोहम्मद अझहर,मोहम्मद दानिश अजहर,अल्ताफ मुमताज खान, अमीन टेलर,शब्बीर कुरेशी,जुबेर खान,मो सुफियान, मो,अफसर,राजूर सरपांच डॉ अनिस खान,बाबा शेख,अनिस खान,वसीम खान,आदी अनेक राजकीय व समाजिक शेत्रतील लोक उपस्थित होते.
या कार्यक्रमला यशस्वी करण्यासाठी अल मदिना एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष प्राध्यापक रईस काझी सर, पत्रकार नदीम शेख,इमाद काझी,वसीम खान,शेख साजिद,जुबेर रिझवी काशीफ काझी, व अल्मदिन ट्रस्टचे सतीश सदस्य व कार्यकर्त्यांनी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.