spot_img
spot_img

उल्कानगरीत पोलिसांचा ‘रूट मार्च!’ -दंगा काबू पथकाने केली रंगीत तालीमची प्रात्यक्षिक!

लोणार (हॅलो बुलढाणा/यासीन शेख) कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद निमित्ताने

लोणार शहरातील गणपती विसर्जन मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. दरम्यान विनायक चौकात दंगा काबू पथकाने रंगीत तालीमची प्रात्यक्षिक सादर केली.

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद काळात जनतेच्या मनात विश्वास, सुरक्षेचे वातावरण व सुरक्षेची भावना निर्माण व्हावी तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी लोणार शहरातून शिस्तबद्धरीत्या रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे, एस.आर.पी.एफ.चे पोलीस उपनिरीक्षक चौरे, प्रो. पोलीस उपनिरीक्षक साठे, मानकुटे, एस.आर.पी.एफ. प्लाटून, आर.सी.पी. पथक, पोलीस स्टेशनचे अंमलदार, होमगार्ड पथक असा फौजफाटा सहभागी झाला होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!