spot_img
spot_img

दिलीप खरात यांचा राज्यस्तरीय ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्काराने सन्मान!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) संकट काळात धावून जाणारे व मदतीसाठी हात देणाऱ्या दिलीप खरात यांच्या सेवाकार्याची दखल घेत पहाट फाउंडेशनकडून त्यांना ‘राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार 2024’ देऊन 14 सप्टेंबरला गौरविण्यात आले आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील बोराखेडी बावरा येथील दिलीप खरात समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेत असतात. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले.त्यांच्या या समाजकार्याची दखल घेत पहाट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार 2024’ साठी खरात यांची तत्पूर्वीच एका समितीने निवड केली होती.हा पुरस्कार त्यांना
महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते 14 सप्टेंबरला देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!