spot_img
spot_img

30 लक्ष रुपये प्रकरण.. या सरकारी खादाडांना जमालगोटा कोण देणार? फुकट खाऊंची ‘ए टू झेड’ पर्यंतची माहिती देणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांना ‘हॅलो बुलढाणा’ देणार 5 हजारांचे बक्षिस!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा सामान्य रुग्णालय भ्रष्टाचाराचे कुरण ठरले असून अहवाला नुसार काही दोष सिद्ध झालेल्या सरकारी खादाडांनी मोठ्या प्रमाणात पैसा गिळंकृत केलाय.पैसे खाण्याचा भस्म्यारोग जडलेले हे खादाड सध्या रवंथावस्थेत दिसताहेत.या फुकट खाऊंनी आयुर्वेद युनानी या वार्षिक योजनेतील रुग्णालयाच्या सुविधेमध्ये वाढ होण्यासाठी असलेल्या 30 लक्ष रुपयांची रक्कम खोटे बिल काढून हजम केल्याची माहिती सूत्रांकडून ‘हॅलो बुलढाणा’ च्या हाती आली आहे. दरम्यान या प्रकरणातील ए टू झेड पर्यंतची माहिती देणाऱ्या कार्यरत जिल्हा शल्यचिकित्सकांना भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला म्हणून ‘हॅलो बुलढाणा’ 5 हजारांचे रोख बक्षिस देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

गलेलठ्ठ पगार असूनही जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालाय. हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊन सुद्धा कारवाई कृमगतीने सुरू असल्याचे आश्चर्य आहे. रुग्णालयात भ्रष्टाचार करताना वेगवेगळे फंडे मोठ्या चलाखीने वापरण्यात आले.या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारातील एक फंडा 30 लक्ष रुपयांचा आहे.
सन 2016 – 17 मध्ये आयुर्वेद युनानी योजनेअंतर्गत रुग्णालयाच्या सुविधांमध्ये वाढ व्हावी याकरिता 30 लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून याबाबत मान्यता घेण्यात आली.त्यानंतर जिल्हा कोषागार कार्यालयातून 30 लक्ष रुपयांचे देयक पारित करून घेण्यात आले.दरम्यान या भस्मासुरांनी प्रत्यक्षात 30 लाख रुपयांचा खर्च हा सन 2016 – 17 मध्ये भ्रष्टाचार करून खोटी बिले सादर करून एवढी मोठी रक्कम गिळली परंतु प्रत्यक्ष कोणतेच काम न करता खोटे बील जोडून त्या काळातील ( “मान” सन्मानतील ते मान्यवर) प्रशासकीय अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी संगणमत करून सन 2019 – 20 मध्ये देयक अदा केले आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमानुसार दोषींवर कारवाई व्हावी आणि देयक व्याजासह त्वरित वसूल करावे व या दोषींवर फौजदारी खटला दाखल करण्यात यावा,अशी मागणी आता केली जात आहे.विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस कॅशबुक तपासणी करणे नियमानुसार बंधनकारक आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी महिन्यातून एकदा कॅशबूक तपासणी करणे आवश्यक आहे.
नियमित कॅशबुक तपासणी झाली असती तर जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या विभागातील कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला नसता! (पण भ्रष्टाचार करणारेच असे काम करतात थोडीच ? ) दरम्यान या प्रकरणातील देयकेनुसार केलेला खर्च जिल्हा सामान्य रुग्णालयातून ‘त्या’ दाखविलेल्या खर्चाची बिले व चेक दिल्या पर्यंतच्या माहितीसह या प्रकरणातील अधिकृत माहिती सध्या कार्यरत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपलब्ध करून दिल्यास भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी मदत केल्यामुळे त्यांना ‘हॅलो बुलढाणा’ दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजकडून 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

शासनाचा भला मोठा पगार असून सुद्धा भ्रष्टाचार करणाऱ्या त्या दोषींना शासनाने गजाआड करावे व त्यांची ( पूर्व परिस्तिथी व आजची परिस्थितीची ) पूर्ण माहिती घेऊन भ्रष्टचारातून कमावलेली सर्व चल-अचल संपत्ती शासन तिजोरीत जमा करण्यात यावी अशी मागणी जोर धरीत आहे

क्रमशः

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!