बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या वाद्यांमध्ये प्रखर बिम लाईट व लेझर बिम लाईटचा वापर केल्याने निसर्गासह मानवी आरोग्याला धोका होण्याची शक्यता असते.त्यामुळे आता कायद्याने डोळे उघडले असून,मंगळवारी गणेश विसर्जन असल्याने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी 14 सप्टेंबरला लेझर लाईट वापरावर बंदीचा आदेश निर्गमित केला आहे.
बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेले लहान मुले, वयोवृध्द,जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिकांच्या डोळ्यास इजा होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.शिवाय पर्यावरणाची देखील हानी होते. त्यामुळे लेसर लाईट्चा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163(1) नुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.14 सप्टेंबरला बंदी आदेश जारी करण्यात आला. या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. मंगळवारी गणेश विसर्जन आहे. या आनंदाच्या भरात लेझर किरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.मात्र त्याचा नेत्रपटलांवर होणारा विपरित
परिणाम लक्षात घेऊन मिरवणुकीत लेझरचा वापर करू नये, ‘लेझर शो’च्या लाइटमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ
शकते. त्यासोबत रेटिनाच्या मध्यावर हा लाइट पडला तर डोळा भाजतो व नजर कायमस्वरूपी कमी होते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे
आवाहन जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.