spot_img
spot_img

नवयुवक गणेश मंडळाच्या ‘रक्तदान महायज्ञात’ ३४ रक्तदात्यांची समिधा! -दरवर्षी राबवितात समाजोपयोगी उपक्रम

धामणगांव बढ़े (हॅलो बुलढाणा) पान्हेराखेडी येथील नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा १३ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिरामध्ये मंडळाच्या ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शासकिय रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले आहे.

नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने वर्षभर सातत्याने नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविले जातात, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, स्मशानभुमी विकास व व्यवस्थापन, अभ्यासिका व्यवस्थापन, ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, सामजिक सलोखा, अंधश्रध्दा निर्मूलन, व्यायामशाळा व्यवस्थापन, अशा महत्त्वाच्या विषयात मंडळाने उल्लेखनीय कार्य केले आहे, त्यांच्या या सामजिक कार्याबद्दल २०१६ मधे नवयुवक सार्वजनिक महाराष्ट्र शासनाने गणेश उत्सव मंडळाला तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान केलेला आहे, यंदाच्या शासनाच्या गणेश उत्सव स्पर्धेमध्ये मंडळाने सहभाग घेतला आहे, नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान नवीन कार्यकारिणी गठित करून गावातील विविध समाजाच्या नवतरुणांना व्यवस्थापनाची संधी देत गावकऱ्यांच्या सहभागातून सामजिक सलोखा कायम राखत गणेशोत्सव साजरा करतात.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!