बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शीर्षक वाचून हैराण होऊ नका! चिखलीत भानगड अशी झाली की, शिवभोजन कार्यालयातील माजी पालकमंत्री तथा सिंदखेड राजाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा फोटो पलटी झाला आहे. हा फोटो उलटा ठेवण्याच्या मागचा उद्देश काय?याची चर्चा सुरू असून याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
शिवभोजन थाळी योजना हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. चिखली तालुक्यात देखील ही योजना सुरू आहे. या शिवभोजन कार्यालयात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे फोटो या कार्यालयात लावलेले होते.चिखली येथील शिव भोजन थाळीचा कॉन्ट्रॅक्ट हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शैलेश अंभोरे यांना कोरोना काळापासून मिळालेला आहे.शिवभोजन थाळी योजनेचे ते पूर्ण काम पाहतात.परंतु काय भानगड झाली कुणास ठाऊक ? केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा फोटो आता वर आहे आणि आमदार राजेंद्र शिंगणे यांचा फोटो कार्यालयात उलटा ठेवण्यात आल्याचे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.ही बाब काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सदर कार्यालय मधील फोटोचे चित्रीकरण करून प्रसारमाध्यमांच्या हवाली केले. दरम्यान शिंगणे यांचा फोटो उलटा ठेवण्याच्या मागील कारण काय? हा सध्या तरी चर्चेचा विषय झाला आहे.