spot_img
spot_img

आ.संजू भाऊंच्या हाती ‘बाप्पांच्या आरतीचे ताट!’ -विविध गणेश मंडळात जाऊन केली मनोभावे आराधना! -गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणित!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या मोताळा येथे गणेशोत्सवाचे उत्साही वातावरण असून,या उत्साहाला द्विगुणीत करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी विविध गणेश मंडळाला भेटी देऊन श्री गणेशाची मनोभावे महाआरती केली.

धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात विशेष रूची असल्याने आमदार संजय गायकवाड अशा कार्यक्रमांमध्ये आवर्जून हजेरी लावतात. मोरया मुळे सर्वत्र मंगलमय वातावरण असताना, गायकवाड यांनी 13 सप्टेंबर रोजी मोताळा गाठले.दरम्यान विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गायकवाड यांच्या हस्ते विघ्नहर्ता गणरायाची महाआरती करण्यात आली. संजुभाऊ गायकवाड यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सोनू गणेश उत्सव मित्र मंडळ,जय मल्हार गणेशोत्सव मंडळ ,सर्वेश्वर गणेशोत्सव मंडळाला भेट देवून गणरायाची महाआरती केली.
यावेळी 19 सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरांमध्ये होणाऱ्या भव्यदिव्य लोकार्पण सोहळ्याला समस्त माता-भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!