spot_img
spot_img

बातमी असावी तर ‘हॅलो बुलढाणा’ सारखी! -जनसामान्यांची प्रतिक्रिया.. -समस्यां उजागर करताच युवा सेनेने रेटला प्रश्न!

देऊळगाव राजा(हॅलो बुलढाणा / संतोष जाधव) ‘आ गये,और छा गये’ असं गोड कौतुक होत असले तरी ‘हॅलो बुलढाणा’ हुरळून जाणार नाहीये.किंवा स्वतःची पाठ थोपटून घेणार नाही.वेब पोर्टलच्या बजबजपुरीत अल्पावधीतच वेगळेपणा जपून, ‘हॅलोबुलढाणा’ वृत्तधर्म निभावत आहे.याचा प्रत्यय नेहमीप्रमाणे काल देखील आलाय.नुकतीच ”मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींवर आनंदाचा पाऊस, पंतप्रधानांच्या घरकुल योजनेतील बहिणींवर चिंतेचे ढग” या मथळ्याखाली बातमी उमटताच देऊळगाव राजा येथील युवा सेनेने घरकुलाचा प्रश्न शासन दरबारी रेटला आहे. जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे ‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीमुळे अनेकांनी समाधान व्यक्त करीत ”बातमी असावी तर ‘हॅलो बुलढाणा’ सारखी” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘हॅलो बुलढाणा’ने घरकुल संदर्भातील बातमी प्रसारित करून थेट मुख्यमंत्री यांचेवर संधान साधले.दरम्यान या वृत्तामुळे युवा सेना लाभार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिली.युवा सेनेचे
तालुका समन्वयक दिपक पंजाबराव पवार यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती, देऊळगांव राजा यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना घरकूलाच्या थकीत हप्ते मिळण्यासाठी निवेदनातून मागणी रेटली आहे.शिवाय आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. मोदी आवास योजने अंतर्गत मंजुर झालेले घरकुलाचे बाकी असलेले अनुदान तात्काळ लाभार्थ्यांना मिळावे,नविन घरकुलाचे उदिष्ट घरकुलाचे हाप्ते लाभार्थ्यांना अदा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.लाभार्थ्यांचे हप्ते न मिळाल्या मुळे ते प्रचंड अडचणीत आहे.
तात्काळ त्यांचे खात्यात राहिलेले हप्ते अदा करण्यात यावे. तसेच पंतप्रधान आवास प्रपत्र- ड व प्रपत्र-ब रमाई आवास योजने अंतर्गंत मंजुर असलेले घरकुलाचे आलेले नवीन उदिष्ट तालुक्यातील लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे तात्काळ
अदा करण्यात यावे.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर 15 दिवसानंतर युवा सेनेच्या वतिने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिपक पंजाबराव पवार, स्वप्निल अशोकराव शहाणे,संदिप सारंगधर तळेकर,
भानुदास शामराव खांडेभराड,
संतोष श्रीराम तळेकर,संजय राजेश डोंगरे,
प्रकाश पाटोळे यांनी दिला आहे .

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!