spot_img
spot_img

गणेशोत्सवा आडून मतांची बेगमी! -गणेश मंडळांना ‘राजकीय मोदक!’ -सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्याही ‘आमदारकी’साठी उड्या!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ प्रशांत खंडारे) सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजताहेत.पक्षीय उमेदवारांसह इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्याही प्रचारासाठी उड्या पडत असून, आमदारकीचे स्वप्न रंगविल्या जात आहे.जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारां कडून मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विवीध शक्कल लढविली जात आहे.सध्या गणेशोत्सवाच्या आडून मतांची बेगमी करण्याची रणनिती राजकीयांकडून आखली गेली असून,श्री गणेश आगमनापूर्वीच गणेश मंडळांना राजकीय मोदक वाटण्यात आले आहे.

उत्सव प्रिय बुलढाणा जिल्ह्यात एकूण 1200 गणेश मंडळांनी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली आहे.गणेशोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होत असते.गणेशोत्सव म्हटला की वर्गणी आलीच!गणेश मंडळाचे कार्यकर्ते वर्गणी मागायला सर्वात आधी राजकीय लोकांना गाठतात.त्यामुळे राजकीय मंडळींनी देखील आगामी निवडणूक पाहून आणि मंडळातील कार्यकर्त्यांची फौज लक्षात घेऊन कार्यकर्त्यांच्या हातावर तत्पूर्वीच वर्गणीचा लहान-मोठा मोदक ठेवला आहे. सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या आडून सर्वच उमेदवारांनी बाप्पांची आरती हातात घेत निवडणूकीच्या छुप्या प्रचाराचा डाव साधने देखील सुरू केले आहे. बुलढाणा जिल्हा अनेक समस्यांनी पीडित आहे.एरवी या समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेले राजकीय पक्ष व विरोधी पक्ष आता मात्र प्रत्येक समस्या सोडविण्याचे आश्वासन देत मतदारांच्या खुशामती करताना दिसताहेत.एरवी गावात डोकावले नसताना,त्या गावोगावी पोहोचून जनतेच्या समस्या जाणून घेत गाठीभेटीसह
गणेश मंडळांना भेटी, सांत्वन भेटी,यात्रा व आंदोलन- उपोषण करून मी वरचढ असल्याच्या अविर्भावात उमेदवार दिसून येत आहेत. उमेदवारांचे न दिसलेले चेहरे लग्नात,अंत्यविधी आदी कार्यक्रमात दिसून पडताहेत. मोठे अधिकारी म्हणून अनेक वर्ष सेवारत असताना, स्वेच्छा निवृत्ती घेऊन निवडणूक लढवीणाऱ्यांना गरीब व स्वजातीच्या जनतेची आठवण झाली नव्हती. आपला समाज अविकसित आहे शिक्षणात मागासलेला आहे.शासनाकडून मिळणाऱ्या सवलती त्यांना उपलब्ध करून त्यांचे आयुष्य सुंदर करण्याचा मनात विचार देखील आला नव्हता.उलट नोकरीवर असताना महानगरात व शहरात राहून आलिशान जीवन व्यतीत केले.माया जमवली आणि आता सेवानिवृत्ती घेऊन विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे.त्यामुळे अशा उमेदवारांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिले तरी,ते निवडून येण्याची शक्यता तर सोडाच डिपॉझिट देखील जमा होऊ शकते हे वेगळे सांगण्याची गरज नाही,असे राजकीय जाणकार बोलत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!