देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) श्री गणपती उत्सव व ईद -ए- मिलाद सण हे सर्व समाज घटकातील नागरिकांनी जातीय सलोखा राखून बंधुभाव एकतेने सण – उत्सव साजरे करावे असे प्रतिपादन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी देऊळगाव राजा नगरपालिका सभागृहात काल दि. 11 सप्टेंबर रोजी आयोजित श्री गणपती उत्सव आणि ईद-ए-मिलाद शांतता समितीच्या बैठकी प्रसंगी केले. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा,अंढेरा, किनगाव राजा, पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच ईद मिलाद उत्सव दरम्यानचे प्रमुख पदाधिकारी आणि शहरातील प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीदरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अनेक मुद्द्यावर मार्गदर्शन केले उत्साह दरम्यान वापरण्यात येणारे डीजे वाजविल्यास , प्रक्षोभक लाइटिंग, लावल्यास शरीरास कशाप्रकारे इजा होऊ शकते याविषयी सखोल मार्गदर्शन करून कायदा हाथात घेणाऱ्याची कुठलीही गय केल्या जाणार नसून प्रशासन कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी कायदा व सुव्यवस्था बाबतीत सविस्तर अशी माहिती दिली. त्याच्याबरोबर पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी विभागातील पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश उत्सव मंडळाची सविस्तर माहिती सांगितली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ,अंढेरा विकास पाटील, सिंदखेड राजाचे ठाणेदार ब्रह्मा शेळके, किनगाव राजाचे ठाणेदार विनोद नरवाडे, अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्री गणेश मंडळाचे प्रमुख पदाधिकारी ईद-ए-मिलाद उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच शहरातील प्रमुख सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पत्रकार बांधव उपस्थित होते.