बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) यंदा गणेशोत्सव आणि ईद हे दोन्ही सण एकाच कालावधीत साजरे होत असल्याने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढलाय. गणेशोत्सवातील मिरवणुकी वेळी अनुचित घटना घडू नये, याची काळजी पोलीस यंत्रणा घेतेय. दरम्यान एसपींनी डीजेवर बंदी घातली असून आता शहर ठाणेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला गुलाल बंदीचा आदेश जारी केला.जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन विक्री व साठवणूक तथा गुलाल वापरावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली असून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांनी 10 सप्टेंबर रोजी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5 अन्वये आदेश पारित केला. या आदेशात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन विक्री व साठवणूक करणे व वापर करण्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात येत आहे.सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूकदार यांना गुलाल विक्री व साठवणुकीला प्रतिबंध करण्यात येत आहे.कुणी उल्लंघन केल्यास तो शिक्षक पात्र राहील.गणेशोत्सव व इतर उत्सव साजरे होत असून गणेश विसर्जन सुद्धा होणार आहे.विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळल्या जाते.रासायनिक मुलाला चा वापर केल्याने काही प्रमाणात पर्यावरणाची हानी होते तर मानवी आरोग्यावर परिणाम होतो.मागील काळात मिरवणूक दरम्यान मज्जित परिसरामध्ये गुलाल उधळल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल झाले आहे.त्यामुळे गुलालावर बंदी आणण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.हा आदेश 11 सप्टेंबरला ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिला असून,मिरवणूक काळात गुलाल उधळण्याचे गणेश मंडळांनी टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.