मेहकर (हॅलो बुलढाणा) रामनगर उत्साही गणेश मंडळ दरवर्षी कल्पक व लक्षवेधी देखाव्यातून समाज प्रबोधन करते.यंदाही मंडळांनी वेगळेपण जपले.चक्क एक किलो वजनाची चांदीची गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याने नागरिक गणेश मूर्तीचे रूप पाहण्यासाठी गर्दी करत आहे.
गणेशोत्सवात आपले वेगळेपणा जपत जोपासत आलेल्या रामनगर गणेश उत्सव मंडळाच्यावतीने यंदा प्रथमच चांदीची गणपती बाप्पांचीचांदीची देखणी मूर्ती साकारण्यात आली आहे. मंडळाच्या वतीने चांदीची मूर्ती बसविण्याचा संकल्प बऱ्याच दिवसांपासून होता.त्यामुळे यावर्षी चांदीची एका 1 किलो वजनाच्यागणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.शिवाय चांदीपासून कळस,दुर्वा, मोदक,जास्वंदाची फूले सुद्धा चांदी पासून साकारण्यात आली आहे. रामनगर गणेश उत्सव मंडळाचे सर्व सदस्य गुण्या गोविंदाने एकत्रितपणे मेहनत घेत असल्याने दरवर्षी गणेशोत्सव आनंदाची पर्वणी ठरतो तर सामाजिक एकोपाही दिसून येतो,हे विशेष!