spot_img
spot_img

‘बहोत फडफडा चुके कबूतर,अब ‘बाज’ उडणेवाला है! ‘माहोल’ बदलने वाला है!’ -तब्बल 100 गावांत पोहचली मशाल यात्रा! -शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणतात..सरकारच्या लबाड कार्यक्रमांचा जनता ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सरकारचा सुरू असलेला लबाड कार्यक्रम जनता ओळखून आहे.सरकार प्रति जनतेत वाढत असलेला रोष पाहून,आगामी विधानसभा निवडणुकीत

‘माहोल बदलने वाला है!’ असे सूचक वक्तव्य उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी मशाल यात्रेदरम्यान केले.ही मशाल यात्रा जवळपास 100 गावांमध्ये पोहोचली असून धामणगाव बढे मध्ये मशाल यात्रेला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.सदर मशाल यात्रा ही 151 गावांमध्ये जागर करणार आहे.

नाकर्ते सरकारचे केवळ उद्योगपतींवर लक्ष केंद्रित आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या सरकार विरोधात अभूतपूर्व असंतोष निर्माण झाला असून, येणाऱ्या काळात मतदार त्यांना त्यांची जागा निश्चित दाखविणार,असेही जालिंदर बुधवत म्हणाले.धामणगाव बढे येथे मशाल यात्रा दरम्यान ठिकठिकाणी कॉर्नर बैठकीत घेण्यात येऊन थेट नागरिकांशी चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकात असलेला रोष निश्चितच माहोल बदलविणार असा सूर मशाल यात्रेत दिसून आला.ही मशालयात्रा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात 5 सप्टेंबर पासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काढण्यात येत आहे.आतापर्यंत शंभर गावात ही यात्रा पोहोचली.धामणगाव बढे परिसरातील गावांमध्ये सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. मशाल यात्रेला गावोगावी प्रतिसाद मिळत असून या मशाल यात्रेचा लखलखाट तब्बल 151 गावांमध्ये दिसून येणार आहे. 23 सप्टेंबरला या मशाल यात्रेचा समारोप बुलढाण्यात ‘आक्रोश मोर्चा’ काढून व संबंधित यंत्रणेला नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निवेदन देऊन होईल.खासदार अरविंद सावंत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक दिग्गज नेते या आक्रोश मोर्चाला उपस्थित राहतील.विशेषता शेतकरी कर्जमुक्ती,सरसकट पिक विमा,शेतीला 24 तास वीज पुरवठा, नादुरुस्त रोहित,ठिबक व तुषार सिंचन चे रखडलेले अनुदान, वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीच्या नुकसान आदीसंदर्भात विविध मागण्यांना घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!