spot_img
spot_img

सामाजिक सलोखा राखावा! -जिल्हा पोलीस अधीक्षक विश्र्व पानसरे यांचे आवाहन

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/दर्शन गवई) साखरखेर्डा गावात शांतता प्रस्थापित ठेवायची असेल तर गणेशोत्सव व ईद साजरी करताना सामाजिक सलोखा निर्माण करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्र्व पानसरे यांनी शांतता कमेटी सदस्यांच्या बैठकीत केले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम जाधव, सरपंच सुनील जगताप, माजी सरपंच महेंद्र पाटील,माजी सरपंच कमलाकर गवई,माजी सरपंच दाऊद सेठ कुरेशी उपस्थित होते. गणेशोत्सव सण हा धार्मिक कार्यक्रमांचे एक व्यासपीठ असून यातून सामाजिक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सव मिरवणूक दरम्यान कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी प्रत्येक मंडळांनी घेतली पाहिजे. तसेच मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करताना सामाजिक सलोखा राखणे महत्त्वाचे आहे. सण उत्सव साजरे करताना कोणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तर गुन्हे दाखल करण्यात येतील. असेही मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी माजी प्राचार्य संतोष दसरे,गोपाल राजपूत,राम जाधव,दाऊद कुरेशी,अस्लम अंजूम,अर्जून गवई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शांतता कमेटी बैठकीला उपसरपंच सय्यद रफीक,माजी उपसरपंच रामदाससींग राजपूत,माजी उपसरपंच दर्शन गवई,ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल,माजी उपसरपंच रफीक तांबोळी,पत्रकार अशोक इंगळे, पत्रकार दिपक नागरे,संतोष गाडेकर,गजानन इंगळे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य शुभम राजपूत, श्री शिवाजी हायस्कूल चे अध्यक्ष डॉ. निलम महाजन,गजानन कुले, संग्रामसिंह राजपूत, रामदास कोरडे यासह सर्व पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक अजीम नवाज राही यांनी केले. तर प्रस्ताविक व आभारप्रदर्शन ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले.

spot_img
spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!