बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकरी आत्महत्यांच्या कलंकातून बुलढाणा जिल्ह्या मुक्त झाला पाहिजे या संदेशासह शेतकऱ्यांची वर्तमान आणि स्वराज्यातील परिस्थितीची प्रतिकृती श्री महालक्ष्मी महागौरीच्या देखाव्यात बुलढाण्यात साकारली आहे. बुलढाण्यातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी,आझाद हिंद नगरातील अँड.सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या निवासस्थानी सालाबादाप्रमाणे महालक्ष्मी गौरी पूजनात सामाजिक संदेश देणारे छत्रपतींचे स्वराज्य चिमुकल्या मावळ्यांनी साकारले आहे.
शेतकरी कर्जमुक्त तर देश कर्जमुक्त, झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, बेटी बचाव बेटी पढाव, पाण्याचे नियोजन, जिल्ह्यातील प्रमुख पिके यासह विविध सामाजिक संदेशासह चिमुकल्यांनी तयार केलेली स्वराज्याची प्रतिकृती पाहण्यासाठी बुलढाणेकरांची पसंती मिळत आहे. टाकाऊ वस्तु आणि माती पासून टिकाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य साकारण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागला आहे. मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त हा कलंक राष्ट्रमाता मा जिजाऊचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचा पुसल्या गेल्या पाहिजे. देशातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे.पीक कर्ज ,पिक विमा शेतकऱ्यांना त्वरित मिळाला पाहिजे. यासाठी स्वराज्याची प्रतिकृती निर्माण केल्याचे चिमुकल्या मावळ्यांनी सांगितले आहेत.
स्वराज्याच्या प्रतिकृती निर्मितीत चि.शिव, सिद्धांत, कु.ज्ञानेश्वरी, कु.भाविका,कु.गौरी, कु.रामेश्वरी, सौ.योगिता आणि श्रिमती निर्मलाताई रोठे पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.