spot_img
spot_img

एसपी विश्व पानसरे म्हणाले.. उत्सवात डिजे, लेझर लाइट मुक्त संकल्पना राबवावी!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) गणेश उत्सवात डिजे, लेझर लाईट चा वापर न करता सण उत्सव आंनदात साजरा करा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे परखड मत जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी व्यक्त केले. या मुळ उद्देशाला पुर्णत्वास जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत या पार्श्वभूमीवर भातृमंडळ येथील सभागृहात १० सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली.

यावेळी मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी देवराम गवळी, पोलिस निरीक्षक गणेश गिरी, नायब तहसीलदार श्रीकांत उगले, मुख्य अधिकारी आशिष बोबडे, महावितरण अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी समतेचे निळे वादळचे अशांत वानखेडे, शेतकरी संघटनेचे दामोदर शर्मा आदी मान्यवरांनी आपले मत नोंदवत गणेश उत्सव साजरा करताना डिजे, लेझर लाईट, या सारख्या बाबींमुळे अनेकांना इजा होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.पोलिस आपल्या संरक्षणासाठी कार्य करत असतात ते आपले कर्तव्य बजावत असताना अश्या वेळी नागरिकांनी ही त्यांना सहकार्य केले पाहिजे ही जवाबदारी आपलीं आहे असे विचार व्यक्त केले.
शांतता समितीच्या बैठकीत जेष्ठ सदस्य प्रशासनाचे प्रतिनिधी, गणेश मंडळांचे पदाधिकारी पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

spot_img
spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!