बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेशोत्सवातील महत्वाचा सण म्हणजे गौरी पूजन! गौराईचे मोठ्या थाटात सोनपावलांनी शुभागमन झाले.घरोघरी पांरपारिक पद्धतीने गौराईची नयनरम्य आरास सजली.चिखली रोडवरील संत गाडगेबाबा नगरातील डॉ. विशाल लहाने कुटुंबियांकडून अनोखी सजावट करण्यात आल्याने त्यांच्या ब्रह्मकमळाचा देखावा व विलोभनिय साजश्रृंगारातील विराजमान झालेल्या गौरी गणपतीला पाहण्यासाठी परिसरातील महिलांची लगबग दिसून येत आहे.
कालौघात गौरीची रूपे, पूजनाचे प्रकार,तसेच मांडण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झालेत. आधुनिक काळात गौरींच्या रूपावरही आधुनिकतेचा ठसा उमटलेला दिसतोय. डॉ. विशाल लहानेंनी स्वतः कल्पकतेने गणेशासह गौराईला ब्रह्म कमळात विराजित करून अप्रतिम साज शृंगार केल्या मुळे ह्या गौराईची आरास डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरत आहे. हिरव्या गोल्डन व जांभळ्या गोल्डन रंगाच्या पैठणीतील जेष्ठा- कनिष्ठा लक्ष वेधून घेतात.अंगभर चढविलेला दाग दागिन्यांचा साज
उठून दिसतोय. फुलवरा, पंचपक्वान्नांचे ताट विविध प्रकारची मिठाई आणि गौराईच्या संसारातील रचलेली भांडी अश्या वेगळ्याच थाटातील डॉ. विशाल लहाने यांच्या गौराईची आरास त्यांच्या विशाल नावा प्रमाणे परीसरात मोठी ठरली आहे.