8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

‘खाकी वर्दी’ला समाजसेवेची जोड! -संत गाडगेबाबांच्या संदेशातून कृतीप्रणवता! -वाहतूक पोलीस महेश चोपडे देतात..गरिबांना पोटभर जेवण घोटभर पाणी !

मलकापूर (हॅलो बुलढाणा /करण झनके) सर्वच पोलीस आक्रमक नसतात.त्यांना वेळप्रसंगी कर्तव्य बजावण्यासाठी कठोर व्हावे लागते.परंतु या पोलिसांमध्येही संवेदनशीलता,

हळवेपणा व एक देवमाणूस दडलेला असतो.. याचे प्रत्यंतर गत् काही वर्षांपासून मलकापूरवासी अनुभवताहेत.
‘भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी’ हा संत गाडगेबाबांचा संदेश येथील वाहतूक पोलीस महेश चोपडे प्रत्यक्ष कृतीतून उतरविताहेत.हे प्रेरणादायी म्हणावे लागेल!

कोरोना काळापासून अविरतपणे रस्त्यावरील भुकेल्यांना अन्न अन् तहानलेल्यांना पाणी देऊन शहर पो.स्टे.चे वाहतूक पोलीस महेश चोपडे हे माणुसकीचे दर्शन घडवित आहेत.
मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस महेश चोपडे यांचे कार्य हे अनेकांसाठी प्रेरक असे ठरत आहे. नेहमीच ते गोरगरीबांना आपल्या परीने होणारी मदत करतात. ज्या कोरोना काळात कोणी कोणाचा विचारही करत नव्हते अशावेळी महेश चोपडे यांनी रस्त्यावर राहणार्‍या व गोरगरीबांना पोटभर जेवण देऊन त्यांचा आत्मा तृप्त करण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे. रस्त्याच्या कडेला बसलेले वा रस्त्याने जाणारे गोरगरीब भुकेल्यांना पोटभर अन्न व तहानलेल्यांना पाणी पाजण्याचे ते विसरत नाहीत. त्यामुळे खाकी वर्दीतील त्यांचीही समाजसेवा उल्लेखनीय ठरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!