spot_img
spot_img

‘छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही!’ -आत्मनिर्भर भारत !! डॉ.योगेश शेवाळेंची लेखणीतून..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाई,तुम्ही पाहिलं का काल armless swimmer ने world record केला …..सकाळी रनिंग सुरु असताना शैलेश म्हणाला ….क्या बात है ….काय mind सेट आहे राव या लोकांचा ….जबरदस्त ….मी धापा टाकत टाकत म्हणालो …..armless archer शीतल देवी perfect 10 bullz eye टार्गेट मारते …javelian थ्रो मध्ये अँटी ल याला एक पाय नाही पण जजबा अफलातून …बेंच प्रेस 200 kg प्लस वजन मारणारे प्लेअर …achondrplasia सारख्या देहयष्टी वाल्या नवदीप सिंग ने javelian भारी फेकला ……म्हणजे एक से बढकर एक ….हे ज्यांना मेडल मिळाले …बाकी पण कैक असतील …..delayed development वाल्या दीप्ती जीवनजी हिने रनिंग मध्ये gold मेडल घेतलं ….. लहानपणापासून किंवा accident पासून दवाखाने वैताग आणि अवहेलना …याना सामोरे जात , मन घट्ट करत समोर पाऊल टाकणे हि वेगळीच ऊर्जा …

एक बालरोगतज्ज्ञ म्हणून दररोजच या गोष्टींना सामोरे जावे लागते …परंतु अशा विपरीत परिस्थितीवर मात करून पुढे जाणे सोपे नाही …या सर्वानी एक आदर्श खरं म्हणजे समाजासमोर ठेवला आहे …या लोकांनी त्यांच्या कमतरतेला त्यांची ताकत बनवली आहे ….यांची ताकत यांच्या दुर्दम्य उच्चशक्ती आणि मेहनतीमध्ये आहे ….
या सर्वांच्या पाठीशी उभ्या असलेल्या त्यांची आई वडील यांच्या निर्धाराचा खऱ्या अर्थाने हा सोहळा …..समाज म्हणून आपणही यांना मदतीचा हात द्यावा हेच खरं दायित्व ….
क्रिकेट वर्ल्ड कप पेक्षा हा सोहळा माझ्या दृष्टीने मोठा …
कुठून आणत असतील हि मंडळी एव्हडा उत्साह ,पॉसिटीव्हिटी आणि साहस …..जिंकण्याचा खरा आनंद तेव्हाच आहे जेव्हा लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात ….यांनी तर उभे आयुष्य स्वतःला उभे राहण्याच्या संघर्षात घालवले आहे …सलाम …आणि या संघर्षाला तोंड देणाऱ्या या माता पिताना त्रिवार वंदन ….
विजू म्हणाला मित्रा दरवर्षी कळसुबाई शिखरावर विकलांगांचा एक ट्रेकिंग ग्रुप जातो …काठ्या कुबड्या घेऊन चढतात ….पडतात …सगळं आत्मक्लेश काढून ;ताठ मानेने उभे राहतात आणि पुन्हा एक उमेदीने वर्षभर जगाला तोंड देण्यासाठी सज्ज होतात ….
माझ्या मते भारतात आल्यानंतर ओपन बस मध्ये मिरवणुकीचे खरे हकदार हे paraolympian आहेत
सलाम या जिद्दीला
सलाम या मेहनतीला

सुरेश भटांनी म्हंटले आहे …
‘विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…..
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही’

‘छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,.
अजुन अशी भिंत नाही’

फिनिक्स पक्षा प्रमाणे नष्ट झाल्यावरही राखेमधून पुन्हा आयुष्याची सुरुवात करणाऱ्या या पॉसिटीव्हिटी ला सलाम!

‘सरपणासाठी आणलेल्या लाकडाला पालवी फुटली ;
त्याचे त्यालाच कळेना
हि जिद्द त्याला कुठून सुचली’
( शब्दशः अर्थ न घेता भाव महत्वाचा ) असे डॉक्टर शेवाळे यांची लेखणी बोलत आहे. 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!