spot_img
spot_img

रात्री राजुर घाटातील मंदिरात ‘अस्वलाचा खेळ चाले!’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरालगत असलेल्या राजुर घाटात रात्रीचा प्रवास करणे धोकादायक ठरत असून, राजुर घाटातील वळण रस्ता रात्री पार करीत असताना, सतर्कता बाळगणे आवश्यक झाले आहे. त्याचे कारण असे की,काल रात्री दहा वाजता राजुर घाटातील मंदिरात भला मोठा अस्वल वावरताना आढळून आला.अस्वल म्हणा की बिबट येथे अनेक वेळा आढळून आलेत.संभाव्य वन्य प्राणी व मानव संघर्ष टाळण्यासाठी सावध पावले उचलण्याची गरज आहे.

बुलढाणा शहर जंगलव्याप्त आहे.शहरालगत
च्या जंगल परिसरात वन्य प्राण्यांचा खाद्यासाठी वावर वाढत आहे. अस्वल-बिबट भक्षाच्या शोधात अगदी मानवी वस्तीकडे वळताना दिसतात.काल रात्री राजुर घाटात दहा वाजता एक भलेमोठे अस्वल मंदिरात आढळून आल्याचे एका वाहन चालकाने कॅमेरा बंद केले.हा अस्वल मंदिरातील तेल किंवा अन्य खाद्यान्न शोधताना दिसून आला.मागील काळात अस्वलाच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.त्यामुळे राजुर घाटातून प्रवास करताना जरा जपूनच प्रवास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!