बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा वनक्षेत्र बिबट्यांचा हॉटस्पॉट झालाय! क्षेत्रीय वनविभागाच्या सूत्रानुसार, जिल्ह्यात 350 बिबट असल्याचा कयास लावल्या जात आहे. त्यामुळे मानव आणि वन्य प्राण्यांतील संघर्षाच्या ठिणग्या उडतताहेत.या पार्श्वभूमीवर वन विभागाने 14 बिबटे अन्यत्र रवाना केले. दरम्यान गिरडा येथील तत्पूर्वीच एका शेतकऱ्याला बिबट्याने ठार केल्यामुळे यापरिसरात अजूनही बिबट्यापासून सुरक्षिततेसाठी वनविभागाचा जागर सुरू आहे.
बुलढाणा शहराच्या जवळ असलेल्या भागातील गिरडा, गोंधनखेड, देव्हारी सह ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. यापूर्वी देव्हारी व गोंधन खेड परिसरात बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली.या पार्श्वभूमीवर वनविभागाने 2 महिन्यात 4 बिबटे पिंजऱ्यात कैद केले.बिबट्यापा सून संरक्षणासाठी या परिसरात आजही वन विभागाकडून डीएफओ सरोज गवस,आरएफओ अभिजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनजागृतीचे काम सुरू आहे.गिरडा जंगलातून जाणाऱ्या मार्गावर तसेच गावात जनजागृतीसाठी वन विभागाने बॅनर लावले असून वन कर्मचाऱ्यांची गस्त देखील वाढविण्यात आलेली आहे,अशी माहिती गिरडा वनरक्षक प्रदीप मुंढे यांनी दिली आहे.