spot_img
spot_img

देवमरण! संवत्सरी प्रतिक्रमण करतांना मृत्यूने गाठले! -परंपरेला फाटा देत आईच्या पार्थिवाला दिला मुलींनी खांदा!

लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) जैन समाजात अत्यंत पवित्र आणि महत्वाचा समजल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी दिनांक ७ सप्टेंबर रोजी गुरु भगवंतांच्या सनिध्यात संवत्सरी प्रतिक्रमण करत असतांना येथील धर्मिक सुश्राविका सौ विजयाबाई सतिष संचेती यांना देवमरण प्राप्त झाल्याने जैन समाजात या दुखद घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.स्थानिक आनंद मंगल सभागृहात आठ दिवशीय पर्युषण पर्वाची सांगता दिनांक ७ स्प्टेंबर २०२४ संवत्सरी प्रतिक्रमण होत असतांना सायंकाळी ६ वाजता दरम्यान अतिशय धर्मिक आणि तपस्वी असलेल्या सौ विजयाबाई सतिष संचेती यांना हृदय विकाराचा धक्का आला दरम्यान त्यांनी जैन पोषद अवस्था धारण केलेली असल्याने त्या एकप्रकारे साधु स्वरुपातच होत्या त्यामुळे त्यांना जैन रीती रिवाज प्रमाणे जागेवरच देवमरण प्राप्त झाले . पर्युषण पर्वाच्या आठ दिवस सौ विजयाबाई संचेती यांची तप साधना सुरु होती दरम्यान त्यांनी प्रभु भक्ति मध्ये स्वताला गुंतवून घेतले होते. आज त्यांच्या अशा जान्याने संपूर्ण जैन समाजात त्यांच्या प्रति हळहळ व्यक्त होत आहे आज त्यांची पालखीतुन अंतिम यात्रा काढण्यात अली यावेळी साध्वी प.पु.प्रियस्मिता श्रीजी मा सा आणि प. पु. अमितसुधाजी मा सा यांनी मृताम्याला मांगलिक प्रधान करून देवा चरनी चांगली जागा मीळो अशी प्रार्थना केली त्यांच्या अंतिम यात्रा दरम्यान तपस्वी अमर रहे, तपस्वी स्व सौ विजयबाई संचेती यांचा जयजयकार केला स्थानिक अमर धाम मध्ये त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला यावेळी जैन समाजातील सर्व पुरुष महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

▪️मुलिनी दिला आईच्या पालखिला खांदा 

हिन्दू आणि जैन धर्मात अंतिम यात्रे दरम्यान मुलगा आई वडिलांच्या अर्थिला खांदा देतो मात्र स्व सौ विजयाबाई संचेती यांना मुलगा नसल्याने त्यांच्या तीन मुलींनी आईच्या अर्थिला खांदा देवून आई प्रति कृतज्ञता व्यक्त केली

▪️समाधि मरणाचे जैन समाजात काय आहे महत्व? 

प्रतिक्रमण,धार्मिक क्रियेत असताना आणि तप साधना करतांना अचानक आलेले मरण हे याला जैन समाजात समाधि मरण म्हणतात ही प्रक्रिया फार दुर्मिळ प्रमाणात घडते. त्यामुळे या समाधि मरणाला जैन समाजात फार महत्वाचे मानले जाते. यावेळी शहरातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक अंतिम यात्रामध्ये सहभागी झाले होते.

spot_img
spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!