spot_img
spot_img

डोणगांवच्या ठाणेदारांनी शांतता समितीची बैठक घेतली मात्र गणेश मंडळांना व संबंधितांना बोलाविलेच नाही! -शांतता समीतीची संयुक्त सभा घेण्याची मागणी.

डोणगांव (हॅलो बुलडाणा /हमीद मुल्लाजी) डोणगाव येथे ठाणेदारांनी शांतता समितीची बैठक घेतली मात्र गणेश मंडळांच्या पदाधिकारी व सदस्यांना तसेच महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आमंत्रण दिले नाही.दरम्यान

आगामी सण -उत्सवाच्या काळात गणेश मंडळ,दु्र्गात्सव, ईद मिलादुन नबी असे सण असल्याने उत्सव मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, मरावि महामंडळ कर्मचारी, शांतता समिती सदस्य या मध्ये समन्वय साधून या सर्वांची एक संयुक्त सभा घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उपरोक्त सर्वांची संयुक्तस भा घेतल्यास सण -उत्सव शांततेत पार पाडता येतील असा सूर शांतता समितीच्या बैठकीत निघाला. गणेशोत्सवचा प्रारंभ झाला असुन भक्तीमय वातावरणात गणेश भक्तांनी गणरायाची स्थापना केली आहे.डोणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत 12 पेक्षा अधिक नोंदणीकृत गणेश मंडळ आहे, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा डोणगांव ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी दि 8 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव व ईद ए मिलादुनबी च्या संदर्भात शांतता समिती ची बैठक घेवून सदस्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या. यावेळी फक्त शांतता समिती सदस्यच फक्त उपस्थित होते, यापूर्वी सण -उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळ, दु्र्गात्सव मंडळ पदाधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी,म रा वि महामंडळ कर्मचारी, शांतता समिती सदस्य यांमध्ये समन्वय राहावा म्हणून संयुक्त सभेचे आयोजन केल्या जात होते.या संयुक्त सभेमध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी दिलखुलास मनाने ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या समोर रस्ते, साफसफाई,म,रा वि महामंडळ कर्मचारी समोर विद्युत पुरवठा संदर्भात अडचणी मांडत, त्यावर चर्चा होवून त्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न होत असत, विसर्जन मिरवणूक साठी ग्रामपंचायत पदाधिकारी व म रा वि महामंडळ कर्मचारी यांची आवश्यकता भासते, म्हणून ही संयुक्त सभा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

spot_img
spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!