बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोना काळात केलेलं काम हे महाराष्ट्र सांभाळण्याचं, वाचवण्याचं होतं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनमताची साथ पाठीशी असल्याने शिवसेनेची मशाल निश्चितच परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास संदीप दादा शेळके यांनी व्यक्त केला.ते मशाल यात्रेच्या निमित्ताने कोल्ही गोल्हार येथे एका सभेत ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व बेरोजगारांना रोजगार देण्यात अपयशी ठरलेल्या शासनाच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागरण म्हणून मशाल यात्रा मोताळा तालुक्यात गावोगावी फिरत आहे. या यात्रेला मिळणारा प्रतिसाद हा व्यापक आहे. या दरम्यान गावोगावी कॉर्नर मिटिंग काही सभा होत असून शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधातला आपला रोष सामान्य जनता यात्रेत सहभागी होऊन व्यक्त करत आहेत. यात्रेदरम्यान घेतलेल्या सभेत संदीप शेळके पुढे म्हणाले की, शिवसेना ही कायम समाज हित डोळ्यासमोर ठेवून काम करते. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. राजकारणामध्ये आज निष्ठावंतांची खऱ्या अर्थाने गरज आहे. जालिंदर बुधवत यांच्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आपल्या कार्यकर्तृत्च्या जोरावर जिल्हाभर नव्हे तर राज्यभर आपल्या विकासदृष्टीने केलेल्या कामांमुळे ओळखले जातात. त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ताकद उभी करावी असे आवाहन संदीप शेळके यांनी करत आक्रोश मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं असे आवाहन केले.
यावेळी उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, अपंग सेलचे जिल्हा प्रमुख रामदास सपकाळ, तालुका प्रमुख लखन गाडेकर, माजी तालुका प्रमुख वासुदेव बंडे पाटील, तालुका संघटक राजु बोरसे, युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, डॉ अरुण पोफळे, कि से त प्र अशोक गव्हाणे, सुधाकर सुरडकर, बाजार समिती संचालक संजय दर्डा, राजु मुळे, युवासेना ता प्र संजय शिंदे, उप ता प्र विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, अनंता शिप्पलकर, कामगार सेना ता प्र गजानन कुकडे, सागर घोंगटे, सा न्या वि ता प्र भागवत शिकारे, ओ बो सी सेल ता प्र संदीप पाटील, मंगेश बंडे पाटील, गुलाबराव व्यवहारे, मोहम्मद सोफियान, राहुल जाधव, समाधान बुधवत, रवी गोरे, सुधाकर आघाव, दिपक पिंपळे श्रावण बोरकर, अनिल राणा, निलेश पाटील, विशाल पाटील, सुभाष तामगर, किरण हुंबड, सुनील पाटील, भास्कर शिंदे, गजानन देवाजी पालवे, कमलाकर पालवे, गोपाल जवरे, रामेश्वर बुधवत, बाळासाहेब सिनकर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.