spot_img
spot_img

ब्रेकिंग! बुलढाणा बसस्थानकात एसटीचा अपघात! 2 जण जखमी! -ब्रेक न लागल्याने एसटी स्थानकातील फलाटात घुसली!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बसचे अपघात रस्त्यावर होताना माहित आहे.परंतु बुलढाणा शहरातील बसस्थानकात बस थेट फलाट क्रमांक एक मध्ये घुसल्याने अपघात होऊन 2 महिला जखमी झाल्याची घटना आज घडली आहे. एक महिला
सरकारी रुग्णालयात तर एक महिलेला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

बुलडाणा ते मलकापूर जाणारी 20BL1806 क्रमांकाची गाडी बुलढाणा बस स्थानकात आला क्रमांक एकवर येत असताना,अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने? ही बस थेट फलाट क्रमांक एक मध्ये घुसल्याने प्रतीक्षा करीत असलेल्या दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाविरुद्ध नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!