spot_img
spot_img

‘कामदारच’ नव्हे तर ‘संवेदनशीलता’ जपणारे ‘आमदार!’ -छावाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या उपचारार्थ आ. गायकवाडांनी दिली एक लाखांची मदत!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची आक्रमकता सर्वच जाणून आहेत.रोखठोक स्वभाव असला तरी,त्यांच्या मनातील चोर कप्प्यात हळवेपणा देखील दडून आहे. आक्रमकतेपेक्षा त्यांच्यात संवेदनशीलता अधिक असल्याने गोरगरीब घटकांसाठी ते नेहमीच आधारवड ठरतात.निष्ठावंत कार्यकर्त्यांना जीवापाड जपतात.आज देखील आमदारांनी त्यांचे छावा संघटना पासूनचे खंदे समर्थक राहिलेले श्री विलास शास्त्री यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना तब्बल एक लाखांची मदत दिली आहे.

आमदार संजय गायकवाड हे छावा संघटनेतकार्यरत होते तेव्हा पासूनचे
जुने निष्ठावंत कार्यकर्ते विलास शास्त्री त्या काळामध्ये सर्व समाज बांधवांचा विरोध असताना सुद्धा गायकवाड यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिले.आज त्यांची तब्येत अतिशय खालावली असल्यामुळे ते संभाजीनगर येथे दवाखान्यांमध्ये ऍडमिट आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे,परिवाराकडे त्यांच्या उपचाराकरिता देखील मुबलक पैसे नव्हते.
त्यामुळे त्यांच्या मुलाने आमदार गायकवाड यांच्या कानावर ही बाब टाकली त्यानंतर गायकवाड यांनी त्याला ऑफिसला बोलावून त्यांच्या दवाखान्यासाठी ५० हजार रुपयाची आर्थिक मदत केली. त्यानंतर उपचार सुरू देखील झाले.
परंतु आज ८ सप्टेंबर रोजी पुन्हा दबत्या आवाजा मध्ये त्यांच्या पत्नींचा तसेच मुलाचा गायकवाड यांना फोन आला आणि त्यांनी सांगितले की, दादा तुमच्या भावाची तब्येत सिरीयस आहे,आणि मला मदतीची अत्यंत गरज आहे, यावेळी आमदारांनी क्षणाचा ही विलंब न करता त्यांना ऑफिसवर बोलावुन पुन्हा ५० हजार रुपये दिले तसेच तत्काळ श्री. विलास शास्त्री यांना संभाजीनगर येथील हेडगेवार हॉस्पिटल मधून हलवून त्यांना पुढील उपचार करता जे.जे हॉस्पिटलला नेण्याची संपूर्ण व्यवस्था केली तसेच त्या ठिकाणी उपचार पूर्ण झाल्यानंतर ऑपरेशन करता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी देखील तेथील डॉक्टरांशी त्यांचे बोलणे करून दिले. त्या हॉस्पिटल मधील उपचाराची देखील संपूर्ण जबाबदारी आमदार गायकवाड यांनीच घेतली.यावेळी श्री विलास शास्त्री यांच्या पत्नी व मुलांना अत्यंत गहिवरून आले होते त्यांनी मनोमन भाऊंचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी निघाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!