बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावातील एका सोळा वर्षीय मुलीचा आरोग्य सुविधा व रस्त्या अभावी तिला झोडी करून घेऊन जाताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची काल घटना घडली.या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी आपले रोखठोक मत व्यक्त करून जिल्ह्यातील राजकीय नेते व शासनातील अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामे द्यावे अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र सरकारचे तोंड काळे करणारी घटना काल जळगाव जामोद तालुक्यामध्ये घडली. जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावांमधील सोळा वर्षीय युवतीची अचानक तब्येत बिघडली. या गावांमध्ये कोणत्याही प्रकारची उपचारासाठी प्राथमिक सुद्धा व्यवस्था नाही, गावाला पक्के रस्ते नाहीत, गावांमध्ये वाहन नाही, ॲम्बुलन्स सुद्धा नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षे उलटून सुद्धा गाव खेड्यांची अवस्था जर अशी असेल तर निश्चितच गतिमान सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. या मुलीला उपचारासाठी शेवटी ग्रामस्थ एखाद्या प्राण्याप्रमाणे झोळी मध्ये घेऊन निघाले परंतु विलंब झाल्याने मध्येच या मुलीचा करून अंत झाला. एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा वाजागाजा करीत असताना दुसरीकडे मात्र बहिणीचा अशा प्रकारे करून अंत होतो, ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. थोडी तरी मानवता व लाज शिल्लक असेल तर जिल्ह्यातील राजकीय नेते व शासनातील अधिकारी यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन स्वतःचे राजीनामे द्यायला हवेत,असे परखड मत सतीश पवार यांनी व्यक्त केले.