बुलडाणा (हॅलो बुलडाणा) अस्मानी संकटांमुळे आधीच शेतकरी त्रस्त झालेला आहे त्यात महायुतीचा सुलतानी कारभार देखील आणखी भर घालत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, पिक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीतही जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र काबाडकष्ट करत असताना आज गणरायाच आगमन झाले आहे. त्यामुळे विघ्नहर्ता गणराया शेतकऱ्यांवर संकट टळू दे असं साकड शिवसेना (उध्दव बाळासहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी गणपती बाप्पाच्या चरणी मशाल यात्रेदरम्यान घातले आहे.
होऊ घातलेल्या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने मशाल जागर यात्रा मोताळा तालुक्यात असून आज यात्रेचा चौथा दिवस आहे. गावागावामध्ये मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. सरकारचा हिशोब पूर्ण करण्यासाठी जनता निवडणुकीची वाट पाहून आहे. दहशत आणि दादागिरी च्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. त्यामुळे हे शिंदे- फडणवीस यांचे शेतकरी विरोधी सरकार घालवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी हिताच्या विचारांचे सरकार यावे ही जन माणसाची इच्छा असल्याचेही यावेळी जालिंदर बुधवत म्हणाले. मशाल जागर यात्रेत आज गणपती बाप्पाच्या आगमन निमित्त दर्शन घेत बुधवत यांनी आक्रोश मोर्चाचे निमित्य उपस्थित यांना समजावून सांगितले.
यावेळी संदीप शेळके, उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, अपंग सेलचे जिल्हा प्रमुख रामदास सपकाळ, तालुका प्रमुख लखन गाडेकर, तालुका संघटक राजु बोरसे, युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, डॉ अरुण पोफळे, कि से त प्र अशोक गव्हाणे, सुधाकर सुरडकर, बाजार समिती संचालक संजय दर्डा, राजु मुळे, युवासेना ता प्र संजय शिंदे, उप ता प्र विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, अनंता शिप्पलकर, कामगार सेना ता प्र गजानन कुकडे, गणेश पालकर, सागर घोंगटे, सा न्या वि ता प्र भागवत शिकारे, ओ बो सी सेल ता प्र संदीप पाटील, गुलाबराव व्यवहारे, मोहम्मद सोफियान, राहुल जाधव, समाधान बुधवत, रवी गोरे, सुधाकर आघाव, श्रावण बोरकर, अनिल राणा, निलेश पाटील, विशाल पाटील, सुभाष तामगर, किरण हुंबड, सुनील पाटील, भास्कर शिंदे, गजानन देवाजी पालवे, कमलाकर पालवे, गोपाल जवरे, रामेश्वर बुधवत, बबन खरे, बाळासाहेब सिनकर, गोविंद दळवी राजेंद्र लोखंडे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.