मलकापूर (हॅलो बुलढाणा/जावेद खान) मलकापूर शहरातून वाहणाऱ्या नळगंगा नदीवर गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी उन्हाळ्यात लोकसहभागातून बांधलेला बंधारा नगराध्यक्ष हरिश रावळ यांच्या योग्य नियोजनामुळे आज तुडुंब भरला असून नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके दिमाखात डौलण्यासाठी व नागरिकांना गोड पाणी उपलब्धतेसाठी उपयुक्त ठरत आहे.
मलकापूर शहरातून नळगंगा नदी जाते या नदीवर गेल्या पाच सहा वर्षांपासून उन्हाळ्यात मातीचा बंधारा टाकून पाणी थांबवण्याचे कार्य लोक सहभागातून नगराध्यक्ष हरीश रावळ हे करतात. त्यामुळे आज 45 फूट खोल व एक किलोमीटर लांब व नदीचे दोन्ही पात्र तूंडूब भरले. बांधारा तयार केल्याने शहराला गोड पाणी उपलब्ध होत आहे. गेल्या पाच-सात वर्षापासून नळगंगा नदीमध्ये माता महाकाली प्रभागाजवळ रोहिदास नगरच्या बाजूला नळगंगा नदी पात्रात लोक सहभागातून मातीचा जवळ जवळ 50 फूट उंचीचा बांधारा नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी बांधला.दरवर्षी या बंधाऱ्याची दुरुस्ती करून त्यात पोकलेन लावून नदीतील गाळ व मुरूम टाकून पाणी थांबवण्यात येते. आज या परिसरात 45 फूट खोल व नदीच्या दोन्ही पात्र तुडुन भरलेले पाणी जवळपास एक किलोमीटर दूरपर्यंत थांबलेले आहे. लाखो-करोडो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे.या भागातील खारे पाणी गोड होऊन हातपंप व विहिरींना भरपूर पाणी लागले आहे.शिवाय नदीकाठच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा उत्पादनासाठी लाभ होतो.गेल्या एक महिन्यापासून मलकापूर शहराला या बांधाऱ्यातून जुन्या जॅकवेल वरून पाणीपुरवठा करण्यात येतो. पूर्णा नदीला नेहमी पूर येत असल्याने धोपेश्वर येथून जो नगरपालिकेचा पाणीपुरवठा आहे तो बरेच वेळा खंडित होतो परंतु हा पाणीपुरवठा अखंडितपणे सुरु आहे व मलकापूर शहरवासीयांची तहान भागवत आहे. लोकसहभागाच्या कार्यामुळे व हरीश रावळ यांची योग्य नियोजन कौतुकास पात्र ठरत आहे.