spot_img
spot_img

सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करा.. पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांचे आवाहन! -माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर म्हणाले..विधायक व इको फ्रेंडली उत्सव साजरा व्हावा!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) आगामी काळात श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्वभूमीवर दि.6 सप्टेंबर रोजी शुक्रवारी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे शांतता समिती, गणेश मंडळ पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते ,व पोलीस पाटील ,पत्रकार, लोकप्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली. यात आगामी उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करावे,असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांनी उपस्थिताना केले.

श्री गणेश उत्सव काळात वीज प्रवाह खंडित होऊ नये, श्री उत्सव विधायक व रचनात्मक तसेच पर्यावरण पूरंक कार्यक्रमानी हा उत्सव साजरा व्हावा, अशा सूचना माजी आमदार डॉ . शशिकांत खेडेकर पोलीस अधिकारी संतोष महल्ले यांनी मांडल्या. मंडळानी मूर्ती जवळ स्वयंसेवक नेमावे,कुणाच्याही धार्मिक भावना दुःखऊ नये,अशा सूचना केल्या तसेच पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. न.प प्रतिनिधि सन्मती जैन यांनी नप प्रशासन सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी माझी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, नायब तहसिलदार बालाजी कौसल्ये, डॉ रामदासजी शिंदे, हाजी सिद्विक जनता सेवा, अँड .अर्पित मिनासे, महावितरणचे अभियंता शेटे, शौकत हुसेन, गिरीश वाघमारे, जगदीश कापसे, वसंतअप्पा खुळे, गोविंद झोरे, कैलास धन्नावत, खींद्र मोहिते, अरविंद खांडेभराड, गोपाल व्यास, बंटी सूनगत, हनुमंते, सलीम खान,गणेश मंडळाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी , सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img
spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!