बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या शेताची रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या शेत रस्त्यांची कामे, मातोश्री पांदण रस्ता योजनेतून केली जातात. या पांदण रस्त्यांच्या कामांमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही दिवसापूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी केला होता.आमदारांच्या पी ए ची कथित ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवुन त्यांनी 25 लाखांमध्ये तयार होणारा पान्दन रस्ता सात ते आठ लाखात तयार करून, प्रत्येक रस्त्यामागे लाखो रुपये हे अप्रत्यक्ष रीतीने लोकप्रतिनिधींच्या घशात जात असल्याबद्दल चा आरोप केला होता.
यावर उत्तर म्हणून दुसऱ्या दिवशी चिखलीच्या आमदार श्वेता ताई महाले यांच्या कडून तहसीलदारांची काही पत्र प्रसारित करण्यात आले होते ज्यामध्ये पांदण रस्त्यावर काहीच खर्च झालं नसल्याच्या अनेक क्लिप त्यांच्याकडून व्हायरल करण्यात आल्या होत्या.आता कुणाचं खरं ?आणि कुणाचं खोटं? याबाबतची शहानिशा आपल्याला सरकारी अधिकाऱ्याकडूनच कळणे अपेक्षित होते, त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाला माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीतून “मातोश्री पांधण रस्ते योजनेमध्ये माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्या आरोपात काही तथ्य असल्याचे जाणवत आहे.या योजनेवर काहीच खर्च झाला नाही असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींना या योजनेबाबत अज्ञान असावे? किंवा त्यांनी जाणून-बुजून लोकांमध्ये योजनेच्या पैशाबाबत चुकीची माहिती पसरवली?जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेवर खरोखर करोडो रुपये खर्च झाला आहे.आता या पावसाळ्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त झाले हे जरी खरे असले तरी पान्धन रस्त्याची अवस्था पाहता खरोखर या रस्त्यांवर 25 लाख रुपये खर्च करण्यात आला का ? हा संशयाचाच भाग आहे.
मातोश्री पांधण रस्ते योजनेमध्ये खर्चाचे तीन भाग असतात यामध्ये अकुशल, कुशल व राज्य रोजगार हमी योजना अशा तीन भागांमध्ये खर्चाचे विभाजन केलेले असते, यापैकी अकुशल भागावर बराच खर्च करण्यात आला असून, काही ठिकाणी कुशल व राज्य रोजगार हमी योजना या भागावरही खर्च करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसारित केलेल्या माहितीवरू कळते.जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर चुकीची माहिती देऊन ते आरोप खोडून टाकण्याचा जो प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे संशयाची सुई आपोआपच सत्ताधाऱ्याकडे वळत आहे, आता प्रत्यक्ष जिल्हाधिकारीच चिखली तालुक्यातील बावन्न पान्धन रस्त्यावर खर्च झाल्याचे दाखवीत आहे.अशा वेळेस आमदार श्वेता महाले या आता काय स्पष्टीकरण देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.