बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल दि. 06 सप्टेंबर रोजी मलकापूर पांग्रा तालुका सिं.राजा येथे सण उत्सवनिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी साखरखेर्डा पो.स्टे.चे ठाणेदार गजानन करेवाड यांनी त्या ठिकाणी चर्चा करतांना 5 वेळा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राहिलेले पत्रकार फकीरा पठाण यांना एकेरी भाषेत संबोधून अत्यंत खालच्या पातळीवर अरेरावी केली आणि उद्धटपणाची भाषा वापरून गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींसमोर अपमानीत केले. यासंदर्भात स्थानिक पत्रकारांनी ठाणेदाराला सांगितले की पत्राकारा सोबत तुमचं हे बोलणं बरोबर नाही,असे सांगीतले असता एकही न ऐकता, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या व मी तक्रारीला घाबरत नाही,असे उद्धटपणाने सांगून तेथून काढून दिले. या घटनेचा सिं.राजा तालुक्यातील समस्त पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करत आज 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पत्रकारांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करत या प्रकरणी संबंधीत ठाणेदाराची चौकशी करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी,अशी मागणी केली.यावेळी पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहे.