बुलढाणा (हॅलो बुलढाणा) केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी आज गणेशोत्सवानिमित्त गणरायाचे आगमन झाले. सहकुटुंब विधिवत पूजन करून विघ्नहर्ताचे प्रतापराव जाधव यांच्या परिवाराने सहर्ष स्वागत केले. गणेश भक्ताच्या जीवनातील दुःख नाहीसे होऊन देशातील जनता सुखी समृद्ध आणि निरोगी आयुष्य मिळू दे ….बळीराजाला चांगले दिवस येऊ दे असे साकडे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी गणरायाच्या चरणी घातले. गणरायाची विधिवत पूजाअर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राजश्री जाधव मुलगा ऋषिकेश जाधव सून मयुरी नातू रणविर आणि पुतण्या धिरज जाधव असा आप्त परिवार होता.