बुलढाणा (हॅलो बुलढाणा /प्रशांत खंडारे) शिवसेना नेत्या प्रेमलता सोनोने यांच्या पुढाकारातून 2012 ला जिल्ह्यातील जवळपास 1300 महिलांना पर्यावरणपूरक राखी,होळीचे रंग व मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.या प्रशिक्षणातून प्रेरणा घेत आजपर्यंत बचत गटातील महिलांनी गणपती मूर्ती व्यवसायात पाऊल ठेवून आर्थिक स्थैर्य प्राप्त केलय. त्यांची ही व्यवसायिक गरुड झेप त्यांची कर्तबगारी अधोरेखित करीत आहे.जिल्ह्यातील शेगाव,सोनाळा, मलकापूर, मोताळा,बुलढाणा,खामगाव, जळगाव सारख्या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून त्यांचे स्टॉल लागले असून ‘अस्तित्व’ संघटनेचे हे रोजगाराभिमूख यश प्रेरक म्हणावे लागेल!
शिवसेनेच्या नेत्या प्रेमलता ताई सोनोने पाटील अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा आहेत.त्यांचे महिला, पुरुष, युवक,युतीसाठी रोजाभिमुख करण्यासंदर्भात मोठे योगदान आहे.प्रेमलता ताईंनी सन 2012 मध्ये ‘पर्यावरण पूरक सणांचे सादरीकरण’ असा विषय घेऊन जिल्हाभर 1300 च्या वर बचत गटातील महिलांना पर्यावरण पूरक राखी,पर्यावरण पूरक रंग,पर्यावरण पूरक मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले होते.या प्रशिक्षणातून अनेक महिलांना रोजगार मिळाला. प्रेरणा मिळाली. आणि हा उपक्रम आजपर्यंत सुरू आहे.सुरुवातीला 6 वर्ष प्रदर्शनी आयोजित करून गणेश मूर्ती मोफत देण्यात आली होती.आता मात्र अत्यल्प दरामध्ये मूर्ती विक्री केली जात आहे.शिवाय पर्यावरणाचा जागर देखील करण्यात येत आहे.बचत गटांच्या महिलां साकरत असलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती देखण्या आहेत.
सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे गणपती मूर्तींना ग्राहकांची पसंती मिळत आहे.पर्यावरण रक्षणासाठी 2012 पासून प्रेम लता सोनोने पाटील त्यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या उपक्रमामुळे महिलां स्वतःच्या पायावर उभे राहून मूर्ती व्यवसायात झेप घेऊ शकल्या हे विशेष!
▪️बचत गटांनी स्वतःची बाजारपेठ निर्माण करून ‘अस्तित्व’ जपले!
इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी अस्तित्व संघटनेने गेल्या १२ वर्षापासून पुढाकार घेतला. दरम्यानबचत गटातील महिलांना प्रशिक्षणातून बाजार पेठेत स्टॉल लावणे, ऑर्डर घेणे, प्रदर्शनी लावणे, पर्यावरण पूरक रंग तयार करणे, मोदक बनवणे इत्यादी बाबत प्रत्येक तालुक्यातील 10 बचत गट प्रमाणे 13 तालुक्यातील एकूण 1300 च्यावर महिलांना सदर प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे महिला बचत गटांना स्वतःची बाजारपेठ निर्माण करून अस्तित्व सुद्धा निर्माण करता आले. संग्रामपूर तालुक्यातील 30 शाळांमध्ये शाळु माती व साध्या मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान पीओपीच्या गणेश मुर्त्यांचा स्वीकार होऊ नये यासाठी शाळु माती व मातीच्या गणेश मूर्ती अत्यल्प दरात देण्याचे काम सौ.प्रेमलता सोनोणे पाटील ह्या करत आहेत.