बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सिंदखेड राजातील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही.शुगर कमी झाली बीपी वाढली.प्राकृतिक खालावली असली तरी त्यांनी सरकारला मीडिया द्वारे मागणी करीत जळजळीत इशारा दिलाय.’माझी एलर्जी असेल तर मला बाजूला ठेवा, शहीद होऊ द्या.. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कर्जमुक्त करा!’अन्यथा संभाव्य परिणामाला सामोरे जावे लागेल असे तुपकर म्हणालेत!
आज अन्नताग आंदोलनाचा चौथा दिवस असून,रविकांत तुपकरांची प्रकृती ढासळत चालली आहे.तरी ते शेतकरी प्रश्नांवरमीडियाच्या समोर सरकारला विनंतीपूर्वक बोलले.ते म्हणाले की, चार दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही.शुगर लेवल कमी झाली. बीपी वाढली. तब्येत खालावली.पण सरकार दुर्लक्ष करतेय.सरकारने माझा जीव घ्यायचाच आहे तर खुशाल घ्यावा.मी मरायला तयार आहे शहीद व्हायला तयार आहे.माझी सरकारला एलर्जी असेल तर मला बाजूला ठेवावे.पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा कर्जमुक्त करा..कापसाच्या दरवाढीचे अनुषंगाने केंद्राकडे जा.. हक्काच्या पिक विमा उशिरा का दिला म्हणून विमा कंपनीवर कारवाई .. आणि इतरही मागण्यांवर ठोस पावले उचलावी असे तुपकर म्हणाले.सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.शेतकरी हवालदिल झाला असून,उद्या जर शेतकऱ्यांनी कायदा हाती घेतला तर याला सरकारच जबाबदार राहणार आहे,असाही इशारा यावेळी देण्यात आला.